पुणे : उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे कालवा फुटला : गिरीश महाजन

टीम महाराष्ट्र देशा- खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा फुटल्याने जलप्रलय आलेल्या दांडेकर पूल परिसराची शुक्रवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज अधिकारी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे. नेमकी कशामुळे ही घटना घडली याची चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलाजवळ काल सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटला. त्यामुळे दांडेकर पूल परिसरातील रस्त्यांना अक्षरश: नदीचे स्वरूप आले होते.

कालवा फुटल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले असून झोपडपट्टी मध्ये पाण्याचा प्रवाह शिरला. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यामुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडीही झाली.तसेच कालव्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचे संसार वाहून गेले.

दरम्यान,उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे नव्हे तर  अतिक्रमणामुळेही कालवा फुटल्याची चर्चा आहे. तसेच कालव्या काठच्या बाजूला महावितरणसह अन्य काही खासगी कंपन्यांनी केबल टाकण्याचे काम केले होते. या कंपन्यांनी केबल टाकताना चुकीच्या पद्धतीने खोदकाम केल्यामुळे भिंत खचल्याची चर्चादेखील सुरु आहे.

पुण्यात मुळा कालव्याची भिंत फुटली, लोकांचे संसार गेले वाहून

पुण्यात मुळा कालव्याची भिंत फुटली, महापौरांना करावा लागला स्थानिक नागरिकांच्या रोषाचा सामना

पादचारी पुलाचा भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानं मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प