fbpx

सत्ताधारी विरोधक भाऊ-भाऊ; मिळून पुणेकरांना 200 कोटींचा चुना लावू…

PMC Pune Municipal Corporation

पुणे: छोट्या-मोठ्या योजनांवरून पुणे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांत झुंजल्याच अनेकवेळा पहायला मिळाले आहे. मात्र एकमेकांचे हितसंबंध जपण्यासाठी हेच नेते कधी भाऊ-भाऊ बनतील हे सांगता येत नाही. याचंच मूर्तिमंत उदाहरण सध्या पुण्यामध्ये पहायला मिळत आहे.

झालं असं की सिंहगड रोडवर सर्वे क्रमांक 120 अ आणि 120 ब अशी अडीच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. ही जागा परत मिळण्यासाठी मूळ जागा मालक न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने सात दिवसांपूर्वीच जागा मालकाची याचिका फेटाळली. तर अन्य एक दावा न्यायालयात प्रलंबित आहे. अस असताना देखील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जागा मूळ मालकाला देण्याचा संयुक्तीक प्रस्ताव दाखल केला होता.

यावर काल एका शब्दाचीही चर्चा न करता तो मंजूर करण्यात आला आहे. ही जागा पुन्हा मूळ मालकाला गेल्यास पालिकेचे सुमारे 200 ते 250 कोटीचे नुकसान होणार आहे. यामध्ये मोठे आर्थिक हितसंबंध जोपासले गेले असल्याची चर्चा पालिकेत आहे.