fbpx

जुन्या योजनांना नवीन मुलामा; पुणे महापालिकेचे 5870 कोटींचे अंदाजपत्रक सादर

pmc budget

पुणे: सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचे महापालिका अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यसभेत सादर केले. चालू वर्षासाठी एकूण 5870 कोटींचे बजेट असणार आहे. दरम्यान यंदा नव्याने कोणत्याही योजनांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे जुन्या योजनांना नवीन मुलामा लावण्यात आल्याच दिसत आहे.

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 5397 कोटींचे प्रशासकीय अंदाजपत्रक सादर केले होते. यामध्ये स्थायी समितीकडून 473 कोटींची वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी हेच बजेट 5 हजार 912 कोटींचे होते.
गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे बजेट हे घटल्याचे दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नव्याने लागू करण्यात आलेली जीएसटी प्रणाली आणि घटलेले महापालिकेचे उत्पन्न.

2018- 19 अंदाजपत्रक दृष्टीक्षेपात

24*7 समान पाणीपुरवठा योजना – 320 कोटी

शिवसृष्टी – 25 कोटी

सायकल योजना – 55 कोटी

घनकचरा व्यवस्थापन – 478 कोटी

स्मार्ट सिटी – 50 कोटी

माहिती तंत्रज्ञान 33 कोटी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था – 246 कोटी

नवीन उड्डाणपूल/ ग्रेड सेपरेटर/भुयारी मार्ग/ वाहनतळ – 225 कोटी

टाळजाई टेकडी ते सिंहगड रास्ता बोगदा – 2 कोटी

सिंहगड रस्ता उड्डाणपूल – 10 कोटी

बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास – 10 कोटी

नव्याने समाविष्ट गावांच्या विकास – 98 कोटी