पुणे महापालिका स्मार्ट सिटी कंपनीला एक कोटी देणार

PMC Pune Municipal Corporation

पुणे  – केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभिनाया अतंर्गत स्थापन करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपौरेशन लिमिटेड या कंपनीला पालिकेच्या हिश्यामधील एक कोटी रुपये देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्मार्ट सिटी कंपनीला केंद्र सरकार दरवर्षी १०० कोटी, राज्यसरकार ५० कोटी, तर पुणे महापालिकेला ५० कोटी दयावे लागणार आहेत.

आतापर्यंत केंद्र सरकारने १९४ कोटी, राज्य सरकारने ९३ कोटी, पुणे महापालिकेने दोन वर्षाच्या हिश्शाचे १०० कोटी दिले आहेत. स्मार्ट सिटीसाठी वर्ल्ड बॅंक कॉन्पोसेस्शन फॉर अ‍ॅडिशनल ग्रॅन्ट्स मिळविण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या अनुदाना इतका निधी म्हणजे १९४ कोटी रुपये पालिका आणि राज्यसरकार मिळून जमा झाल्यास ही कंपनी त्यासाठी पात्र ठरु शकणार आहेत.

राज्यसरकार आणि पुणे महापालिकेचा आतापर्यंतचा निधी १९३ कोटी झाला आहे. राज्यसरकारकडून एक कोटीचा निधी कमी प्राप्त झालेला आहे. त्यामुळे पीएससीडीसीएल यांनी २०१७-१८ च्या हिश्श्यामधील एक कोटी रक्कम आगाऊ स्वरुपात देणे झाल्यास स्थायीची मान्यता घेणे आवश्यक होते. पण त्यांनी तातडीने एक कोटीची मागणी केली आहे. त्यानुसार आयुक्तांनी हा प्रस्ताव ठेवला असून २०१७-१८च्या अनुदानातून हे एक कोटी वळते करुन घेण्यात येणार आहेत.