पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा; ‘अनलॉक’ बाबत टोपेंची भूमिका

rajesh tope

मुंबई : राज्य शासनाने नुकतीच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ‘ब्रेक द चेन’ची नवीन नियमावली जाहीर केली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे नियम कायम ठेवले आहे. पण मुंबईतील दुकाने, कार्यालये आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंतची परावनगी दिली आहे. आता यावरूनच भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या विरोधात पुण्यात चांगलीच नाराजी पसरली असल्याचं पाहून आता राज्य सरकारला देखील आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करण्याची वेळ आली आहे. कारण पुणेकरांच्या नाराजीची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आलेली असून आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यामध्ये आज पुण्याच्या निर्बंधावरुन चर्चा झाली.

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निर्बंध हटवण्याबाबत अद्याप थेट भूमिका घेतली नसून राजेश टोपे यांनी भूमिका जाहीर केली आहे. ‘जर पुणे महापालिकेला सध्याच्या कडक नियमावलीमध्ये मुभा हवी असेल तर महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा,’ अशी भूमिका राजेश टोपे यांनी घेतली आहे. असं असलं तरी व्यापाऱ्यांसह सामान्य पुणेकरांना निर्बंधांमध्ये सूट कधी मिळणार हे मात्र अजून जाहीर झालेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या