पीएम केअर्समधून २१ व्हेंटिलेटर्स पुणे महापालिकेला प्राप्त, महापौरांनी मानले मोदींचे आभार

modi

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पीएम केअर्स मधून पुणे महापालिकेला आणखी ८ व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून एकूण संख्या २१ झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यापूर्वी पीपीई किट, मास्क आणि इतर वैद्यकीय साहित्य प्राप्त झाले आहे. या मदतीबद्दल पुणेकरांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत असल्याचे मागपौरांनी सांगितले.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करून आढळणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचारासाठी करण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे मदत केली जात आहे. पीएम केअर फंड ट्रस्टकडून आतापर्यंत 21 व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. भविष्यात आणखी व्हेंटिलेटर प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ. नायडु आणि ससून रुग्णालयात हे व्हेंटिलेटर बसविण्यात आले आहेत. पुणे शहरात रोज 500 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी तर तब्बल 877 रुग्ण आढळले. सध्या रोज कोरोनाच्या 4 हजारांच्या वर चाचण्या करण्यात येत आहेत. भविष्यात आयसीयू आणि व्हेंटिलेटर कमी पडण्याची शक्यता महापालिकेतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविलेले व्हेंटिलेटर महत्वपूर्ण आहेत. भारतात निर्माण झालेले हे व्हेंटिलेटर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविण्यात येत आहेत. 31 जुलै पर्यंत कोरोनाचे 40 हजार रुग्ण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महापालिका उपाययोजना करीत आहे.

दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. मागील 2 दिवसांपासून 800 च्या वर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तब्बल 4 हजारांच्या वर कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याने रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कोरोनामुळे मृत्यू कमी झाले आहेत. मात्र, तरीही नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. विशेषतः जेष्ठ नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.

लढाई जिंकणारच : राजेश टोपेंनी घेतला आणखी एक महत्वपूर्ण निर्णय…

सामुहिक शक्तीच्या जोरावर ‘कोरोना’ला निश्चित हरवू – अजित पवार

यालाच म्हणतात प्रखर …जबर…राष्ट्रप्रेम, नितेश राणेंचे पंतप्रधानांवर स्तुतिसुमने