घटलेल्या उत्पन्नाचा पुणे महापालिकेच्या बजेटला फटका

मागील वर्षी 5 हजार 600 कोटींचे असणारे बजेट यंदा मात्र 5 हजार 397 कोटींचे

पुणे: सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचे महापालिका अंदाजपत्रक आयुक्त कुणाल कुमार यांनी आज स्थायी समितीला सादर केले. घटलेल्या उत्पन्नाचा फटका यंदाच्या अंदाजपत्रकाला बसला असून चालू वर्षासाठी एकूण 5397 कोटींचे बजेट असणार आहे.

२०१७-१८ वर्षासाठी सुमारे ५ हजार ६०० कोटींचे अंदाजपत्रक प्रशासनाकडून मांडण्यात आले होते. त्यामध्ये ३९८ कोटींची वाढ करत स्थायी समितीने ५ हजार ९९८ कोटींचे अंदाजपत्रकाला मंजूरी दिली. मात्र नव्याने लागू झालेला जीएसटीमुळे महापालिका क्षेत्रातील एलबीटी बंद करावा लागला. तसेच इतर मार्गानी येणारे उत्पन्न घटल्याने मागील वर्षी 1700 कोटींची विक्रमी तूट पहायला मिळाली.

याच पार्श्वभूमीवर 2018 – 19 या आर्थिक वर्षासाठी 5397 कोटीचे अंदाजपत्रक करण्यात आले आहे. मागील वर्षीपेक्षा तब्बल 200 कोटींनी यंदाचे अंदाजपत्रक कमी आहे.

You might also like
Comments
Loading...