22 जानेवारीला सादर होणार पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक

PMC Pune Municipal Corporation

पुणे: पुणे महापालिकेचे 2018 – 19 या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक 22 जानेवारीला मुख्यसभेत मांडण्यात येणार आहे. मुख्यतः दरवर्षी 15 जानेवारीपूर्वी महापालिका आयुक्त यांनी आपले अंदाजपत्रक सादर करणे बंधनकारक असते, मात्र आयुक्त कुणाल कुमार हे परदेशात असल्याने यंदाचे अंदाजपत्रक 22 जानेवारीला सादर करण्यात येणार आहे.

मागील वर्षी २०१७ – १८ साठी कुणाल कुमार यांनी जवळपास ५ हजार ६०० कोटींचे अंदाजपत्रक मांडले होते. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांनी ३१२ कोटींची वाढ करत 5 हजार 9१२ कोटींचे बजेट निश्चित केले. मात्र यंदापासून लागू करण्यात आलेला जीएसटी तर दुसरीकडे बंद करण्यात आलेल्या एलबीटीमुळे पालिकेच्या उत्पन्नात घट घाली. त्यामुळे अनेक विकास कामांना कात्री लावण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

सत्ताधारी भाजपचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे, त्यामुळे उत्पन्न आणि नागरी हिताच्या योजनांचा समतोल राखण्यासाठी मुरली मोहोळ यांना तारेवरची कसरत करावी लागणारे. दरम्यान यंदाचा अर्थसंकल्प हा जवळपास ६ हजार कोटींच्या वर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.