पुण्यात मुळा कालव्याची भिंत फुटली, लोकांचे संसार गेले वाहून

पुणे : खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटला. त्यामुळे दांडेकर पूल परिसरातील रस्त्यांना अक्षरश: नदीचे स्वरूप आले होते.

कालवा फुटल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले असून झोपडपट्टी मध्ये पाण्याचा प्रवाह शिरला. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. तसेच रस्त्यावरील वाहनधारकांचाही गोंधळ उडाला. अनेक वाहने पाण्याच्या प्रवाहात अडकली.

जनता वसाहत येथील मुळा कालव्याची भिंत कोसळल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यामुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडीही झाली.

मुठा नदीच्या उजव्या कालव्याला भगदाड पडलं. यामुळे दांडेकर पूल परिसरही जलमय झाला. या परिसरात एवढे पाणी झाले की काही गाड्या पाण्यात अडकल्या. तसेच कालव्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचे संसार वाहून गेले.

‘सोलापूर’च्या ४० रेल्वे पुलांची होणार पाहणी

You might also like
Comments
Loading...