महिला पदाधिकाऱ्याची बदनामी, नगरसेविकेच्या पतीला धु-धु धुतले

पुणे: वायफळ बडबड आणि फुकटचा पुढारपणा एखाद्याला किती महागात पडू शकतो याची प्रचिती पुण्यातील एका नगरसेविकेच्या पतीला याची ‘देही’आली आहे. संबंधित व्यक्ती हा पक्षाचा जेष्ठ पदाधिकारी देखील आहे.

शहरातील पक्षीय राजकारणात स्वतःला जेष्ठ दाखवणाऱ्या या पदाधिकाऱ्याने बदनामीकारक वक्तव्य केल्याने महिला पदाधिकाऱ्याने घरी जाऊन त्याला बडविल्याची घटना घडली आहे. संबंधीत वाचाळ पदाधिकाऱ्याला अशा प्रकारे तिसऱ्यांदा मार खावा लागला आहे. दरम्यान, याच घटनेची चर्चा सध्या पुण्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.याच्याही आधी बाजीराव रस्त्यावर एका नगरसेवकाने पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोरच या महाशयांना चोप दिला होता.