नदी पात्रातील मेट्रोच्या कामाला वेग

टीम महाराष्ट्र देशा –पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्यातील वनाज ते शिवाजीनगर धान्य गोदामपर्यंतच्या कामाला वेग आला असून नदीपात्राच्या कडेने खांब (पिलर) उभारण्याचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) सुरू केले आहे. या ठिकाणी वाहतुकीचा कोणताही अडथळा होणार नसल्याने हे काम लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. सात किलोमीटर मार्गाचे हे काम असून त्यातील 1.7 किलोमीटर रस्ता मुठा नदीपात्रातून जाणार आहे. नदीपात्राच्या कडेने जाणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाचाबाबत काही पर्यावरणवाद्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल केली आहे. त्यावरील निर्णय प्रलंबित असला तरी मेट्रोच्या कामाला कोणतीही स्थगिती नसल्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्यामुळे, वनाझ ते धान्य गोदाम मार्गावरील पहिल्या टप्प्याच्या कामानंतर आता नदीपात्राच्या कडेने दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

IMP