पुण्यातील अतिहुशार माणसांमुळे पुणे मेट्रो प्रकल्पाला विलंब – गडकरी

टीम महाराष्ट्र देशा- पुण्यातील अतिहुशार माणसांमुळे तेथील मेट्रो प्रकल्पाला विलंब होत आहे, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे . ते रविवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी नागपूर आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांची तुलना करताना पुण्यातील भाजप नेत्यांना टोला लगावला.

काय म्हणाले गडकरी ?

“मेट्रोचा आराखडा खूपच सुंदर पद्धतीने तयार करण्यात आला आहे. मात्र, पुण्यातील अतिहुशार माणसं असल्यामुळे त्यावर बरीच चर्चा होते, मतभेद होतात. या सर्व कारणांमुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्प रखडला आहे. याउलट आमच्या नागपूरात एकछत्री अंमल असल्याने सर्व कामे पटापट होत आहेत.केवळ पोस्टर्स, कटआऊट लावून किंवा भाषणे करून कामे होत नाहीत, तर कामांमुळे माणसे ओळखली जातात”.

You might also like
Comments
Loading...