महापौर मुक्त टिळक यांनी केली बालगंधर्व रंगमंदिराची पाहणी

पुणे-बालगंधर्व रंगमदिराला महापौर मुक्ता टिळक यांनी अचानक भेट देऊन स्वच्छतेचा आढावा घेतला.महापौरांच्या या अचानक भेटीमुळे व्यवस्थापकांपासून ते कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. पुणे हे सांस्कृतिक राजधानीचे माहेर घर समजल्या जाते. सध्या पुण्यातील विविध नाट्यमंदिरे विविध समस्यांच्या विळख्यात सापडली असून त्याठिकाणी घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे.  अनेक वेळा अनेक ठिकाणी विविध कलावंतांनी आपली नाराजी  सोशल मीडिया च्या माध्यमातून बोलून दाखवली आहे.
आज महापौरानी बालगंधर्व रंगमंदिरात जाऊन तळघर, ग्रीनरूम, उघड्यावर असेलेले टायर, साचलेले पाणी ह्या सर्व समस्यांचा आढावा त्यांनी घेऊन तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश सुद्धा दिले. त्यानंतर त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू कलामंदिर व दालनाच्या पाहणी करून त्या ठिकाणच्या वव्यवस्थेचा आढावा सुद्धा घेतला. तसेच स्थानिक नगरसेवकानी आपल्या निधीचा वापर कला दालन स्वच्छ करण्यासाठी करावा जर निधीची कमतरता असेल तर महापौर निधीतून निधी उपलब्ध केला जाईल असे सुद्धा ह्यावेळी बोलताना सांगितले ह्यावेळी स्थानिक नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे, नीलिमा खाडे, जोष्ना एकबोटे,  स्वाती लोखंडे, संदीप खर्डेकर उपस्थित होते त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तां सोबत चर्चा करू स्वछतेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले