कोरोनाला हरवून योद्धा परतला, मुरलीधर मोहोळ यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज

muralidhar mohol

पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना तपासणी चाचणी अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. स्वतः महापौरांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांच्यात कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे आढळली नाही. त्यामुळे मोहोळ यांना गुरुवारी ( दि. ९) रुग्णालय प्रशासनाने घरी सोडले आहे.

‘कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. येत्या १५ तारखेपर्यंत होम क्वारंटाईनची सूचना डॉक्टरांकडून मिळाली आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा, आशीर्वाद आणि प्रेमाच्याप जोरावर मी यशस्वीरित्या आज घरी आलो. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद! होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल, याचं नक्कीच समाधान आहे’. अस रुग्णालयात डिस्चार्ज मिळाल्यानंतर मोहोळ म्हणाले आहेत.

‘…म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं’, अजितदादांचे रोखठोक स्पष्टीकरण

महापौर मुरलीधर मोहोळ यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शनिवारी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांची देखील कोरोना चाचणी केल्यानंतर काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र आता मोहोळ यांना रुग्णालयाने घरी सोडले आहे. मात्र, त्यांना १५ जुलैपर्यंत होम क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे.

अजित पवारांच्या घोषणेनंतर दोन तासातच ‘सारथी’ला मिळाले 8 कोटी रुपये