मुख्यमंत्री साहेब मुंढेना परत बोलवा पुण्याच्या महापौरांची मागणी

महापौरांच्या बैठकीला  तुकाराम मुंढेचा ठेंगा

 

पुणे :  शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसभाडेवाढ प्रकरणी विरोधी पक्षांसह नागरिकांच्या टीकेला समोर जाव लागत असल्याने या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी पीएमपीएमएल प्रशासना सोबत संयुक्त बैठक आयोजित केली होती. मात्र ,  पुणे महानगर परिवहन निगमचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे हे बैठकीला आलेच नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या महापौर मुक्ता टिळक व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंढे यांचा निषेध केला आहे . तसेच मुख्यमंत्र्यांकडे त्यांना परत बोलावण्याची मागणी करणार असल्याच सांगितल आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या बसभाडेदरात अचानक वाढ केल्याबाबत तोडगा काढण्यासाठी म्हणून महापौरांनी मुंढे यांना बुधवारी बैठकीसाठी पाचारण केले होते. आयुक्त कुणाल कुमार यांनी मुंढे यांच्याशी चर्चा करून ही वेळ ठरवण्यात आली होती. तरीही तुकारम मुंढे हे या बैठकीकडे फिरकलेच नाहीत. कामकाजामुळे येऊ शकत नसल्याच असा निरोप पाठवत. त्यांनी आपल्या दोन सहायक अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाठविले.  त्यामुळे महापौर टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ हे पदाधिकारी संतप्त झाले.

बैठकीला न येन हा मुंढे यांचा हा हटवादीपणा आहे. सर्व पदाधिकारी ४० लाख पुणेकरांचे प्रतिनिधित्व करतात. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न त्यांनी गंभीर वाटत नसेल, तर त्यांची तपासणीच केली पाहिजे. पीएमपीमध्ये महापालिकेचे ६० टक्के भागभांडवल आहे. दर वर्षी कोट्यवधी रुपयांची मदत केली जाते. तरीही ते असे वागत असतील, तर त्यांची गरज नसल्याच महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल आहे. तसेच मुंढे यांना परत बोलवावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भात लवकरच त्यांना पत्र सविस्तर पत्र लिहिणार आहे, असे टिळक यांनी सांगितले.