पुण्याच्या महापौरांनी दिला परंपरेला छेद ; ६५ वर्ष्यांच्या परंपरेत खंड

bhaurangari ganpati miravnuk 2017

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण यावरून रंगलेल्या वादाचा फटका गणरायाच्या आगमनाला बसला आहे. साधारणपणे १९५२ पासून श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाच्या रथाचे सारथ्य पुण्याचे प्रथम नागरीक असणारे महापौर हे करत आले आहेत. मात्र यंदा भाऊ रंगारी गणपती मंडळ आणि महापौर मुक्ता टिळक यांच्यात गणेशोत्सवाचे जनक कोण यावरून वाद रंगला आहे. यामुळेच मंडळाने आमंत्रण देवूनही टिळक यांनी भाऊ रंगारी गणपती मिरवणुकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे गेली ६५ वर्षेपासून चालणारी परंपरा यंदा खंडित झाली आहे

परंपरे नुसार पुण्याचे महापौर हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मिरवणूक रथाचे सारथ्य करतात मात्र यंदा महापौरांना निमंत्रण देवून देखील त्या आल्या नसल्याने अनेक दशकांची परंपरा खंडित झाल्याचे भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्थ सुरज रेणुसे यांनी महाराष्ट्रा देशाशी बोलताना सांगितले आहे.

काय आहे वाद

यंदा पुणे महापालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रोप्य महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र भाऊ रंगारी यांनी १८९२ ला सर्व प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली असून मागील वर्षीच गणेशोत्सवाने १२५ वर्षे पूर्ण केली असल्याचा दावा रंगारी ट्रस्टने केला आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक हे लोकमान्य टिळक नाहीत तर भाऊ रंगारी असल्याचा दावाही ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे. या वरूनच महापौर मुक्ता टिळक आणि भाऊ रंगारी गणपती ट्रस्टमध्ये वाद निर्माण झाला आहे.