पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा होणारच – महापौर

पुणे: १९८३ पासून सुरु असणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेवर सध्या टांगतीतलवार असल्याच दिसत आहे. कारण या स्पर्धेच्या आयोजनाला अॅथलेटिक्स महासंघाची मान्यता नसल्याचं पत्र संघटनेकडून देण्यात आल आहे. तर धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी होऊ नये अस आवाहनही महासंघाकडून करण्यात आल आहे. मात्र असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन संघटनेची मान्यता असल्याने दरवर्षी प्रमाणे ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धेच्या स्वागताध्यक्ष महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे.

रविवारी ३ डिसेंबरला पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन करण्यात आल आहे. गेली ३२ वर्षापासून ही स्पर्धा म्हणजे पुण्याची नवीन ओळख झाली आहे. मात्र यंदा भारतीय अॅथलेटिक्स महासंघाची मान्यता नसल्याच पत्र देण्यात आल आहे. एकेकाळी पुण्याचे कारभारी असणारे सुरेश कलमाडी यांनी या स्पर्धेच्या आयोजनास सुरुवात केली. मात्र राष्ट्रकुल घोटाळ्यात कलमाडी यांना जेलमध्ये जाव लागल्याने मॅरेथॉन आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होत. पुढे आयोजकांनी महापालिकेच प्रायोजकत्व मिळवत स्पर्धा आयोजन सुरु ठेवल. मात्र यंदा महापौरांना नियोजन समितीत स्थान देण्यात आल्याने कलमाडी नाराज असल्याच बोलल जात आहे. त्यामुळे पुणे मॅरेथॉनच्या मान्यतेचा वाद निर्माण झाला.

दरम्यान असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन संघटनेची चालू वर्ष तसेच पुढील वर्षाची देखील मान्यता असल्याने अॅथलेटिक्स संघटनेची मान्यता नसली तरी स्पर्धेच्या आयोजनावर संयोजक ठाम आहेत