मराठी भाषेला नाकाराल, तर याद राखा; मनसेचा आक्रमक पवित्रा

पुणे : प्रादेशिक भाषा ही बँकाच्या दैनंदिन व्यवहाराचे माध्यम असले पाहिजे असा केंद्र शासन व आरबीआय चा नियम असताना देखील केंद्रीय बँका व खाजगी बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे व केंद्र सरकारच्या दबावापुढे झुकत हिंदी भाषा माथी मारण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.

मनसेने पुणे शहरातील सर्वच बँका व मोबाईल कंपन्या व बीएसएनएल या ठिकाणी पत्र देत मराठी भाषाच व्यवहाराचे माध्यम असली पाहिजे, ही आग्रही मागणी केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या शहरातील बहुसंख्य एटीएममध्ये इंग्रजी, हिंदी आणि गुजराथी भाषा माध्यम म्हणून वापरली जात आहे. आज मनसेने बँक ऑफ बडोदाला जाब विचारत मराठी भाषा व्यवहारात दिसली नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला. बँका व मोबाईल कंपन्यांनी दैनंदिन व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करण्यास सुरवात न केल्यास मनसे आक्रमक आंदोलनाला सुरवात करेल, असेही यावेळी सांगितले.

Comments
Loading...