fbpx

पुणे : नव्याने समाविष्ट झालेल्या गांवामधील बहुमजली अनधिकृत बांधकामे पाडली जाणार

पुणे : पुणे महापालिका हद्दीतील आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गांवामधील बहुमजली अनधिकृत बांधकामे पाडण्याची निवीदा महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुर केली आहे. शहर, उपनगर आणि पालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. तर उपनगर आणि समाविष्ट गावांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत.

समाविष्ट गावांमध्ये सुरू असलेल्या बहुमजली बांधकामांना ग्रामपंचायत परवानगी असल्याचे सांगून सदनिका विक्री केल्या जातात. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होते. या पार्श्वकभूमीवर बहुमजली अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.