पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

manse photo

टीम महाराष्ट्र देशा –पुण्यातील फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्या सामानाची नासधूस करणाऱ्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आज शिवाजीनगर न्यायालयाने २१ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या मध्ये अजय शिंदे, राम बोरकर, नरेंद्र , आशिष देवधर, कृष्णा मोहिते, गणेश पाटील, अभिषेक थिटे, सुनील कदम, सलीम सय्यद, बाळासाहेब शिंगाडे, सचिन पांगारे, लक्ष्मण काते, प्रवीण क्षीरसागर या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.मनसे कार्यकर्त्यांनी २ नोव्हेंबर रोजी सिहंगड रस्त्यावरील राजाराम पूल आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या दुकानाची तोडफोड करून त्यांच्या सामानाची नासधूस केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे