कर्जबाजारी महापालिकेच्या माननीयांना अलिशान कारची हौस सुटेना

pune mahapalika car purchase

विरेश आंधळकर: कर्जकाढुन सण साजरा करण्याची म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. मात्र याची प्रत्यक्षात अनुभूती घेयची असेल तर पुणे महापालिकेत सुरू असणाऱ्या कारभाराच उदाहरण आपण देऊ शकतो. कारण मागील काही काळात निधी अभावी विकासकांमासाठी हजारो कोटींच कर्ज काढण्याची वेळ पालिकेवर आली आहे. मात्र अशातही एक कोटी किमतीच्या नवीन चारचाकी गाड्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून हा प्रस्ताव ऐनवेळी मांडण्यात आला असतानाही याला मंजुरी देण्यात आली.

मंगळवारी (दि.7) रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसाठी नवीन चारचाकी गाड्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये एकूण एक कोटी किमतीच्या पंधरा नवीन गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. दरम्यान गेल्या काही काळापासून पुणे महापालिकेला निधी अभावी अनेक विकास कामांना कात्री लावण्याची वेळ आली आहे. तसेच पुणे शहरासाठी महत्वाची समजली जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेसाठी काढण्यात आलेल्या दोनशे कोटींच्या कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड पालिकेला बसत आहे. यामुळे एकंदरीतच एका बाजूला निधी नाही म्हणून नागरिकांसाठी गरजेच्या असलेल्या कामांना ब्रेक लावायचा. तर दुसरीकडे गरज नसताना लाखो-कोटींच्या गाड्या खरेदी करून एसी गाडीमध्ये फिरण्याची हौस अधिकारी पदाधिकारी फेडून घेताना दिसत आहेत.

Loading...