Video: ज्यांना पुण्यात दहा वर्षे मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये – बापट

girish bapat

टीम महाराष्ट्र देशा: विरोधकांनी दहा वर्षे मेट्रोचा एक खड्डा देखील खोदला नाही. त्यामुळे ज्यांना पुण्यात मेट्रो आणता आली नाही, त्यांनी श्रेयासाठी रडू नये. असा टोला पुणे लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी लगावला आहे. ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

पुण्यात मेट्रो अंडरग्राउंड करायची की ओव्हरहेड याच्यावरच कॉंग्रेस सरकारने आठ ते दहा वर्ष घालवली, आमचा निर्णय झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन करत मेट्रोचे काम सुरु झाले, शहरात तीन मार्गाची उभारणी सरकारकडून केली जात आहे. पुढे सिंहगडरोड, वाघोली, कात्रजपर्यंत मेट्रो सुरु करण्याचा सरकारचा विचार असून मेट्रो संदर्भात विरोधकांकडून केले जाणारे आरोप खोटे आहेत, पुणेकरांना पुढील १०० वर्षे सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न पडणार नाही, अशी मेट्रो उभारण्यात येत असल्याचं गिरीश बापट यांनी सांगितले आहे.

कसब्यातील नागरिकांचे १०० टक्के पुनर्वसन करणार

कसब्यातील मेट्रो स्टेशनमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नावर विचारल असता, कसब्यातील पेठांच्या विकासाचा विचार करूनच मेट्रोचे काम सुरु केले आहे. गेली ३० वर्षे मी कसब्यातील लोकांचे प्रश्न सोडवले आहेत. विरोधकांनी राजकारण केले तरी नागरिकांमध्ये मी त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा विश्वास असल्याचं बापट यांनी सांगितले. केवळ कसब्याचे नाव सांगून विरोधकांनी मेट्रोचे काम थांबवण्याचा प्रयत्न करू नये. असा इशारा त्यांनी दिला आहे.

पालकमंत्री आणि पुणे लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी महाराष्ट्र देशा’ला दिलेली मुलाखत