लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची आता खैर नाही; ‘अशी’ कारवाई होणार

pune police

पुणे  – पुणे शहरात आज (सोमवारी) मध्यरात्री पासून 10 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात (अत्यावश्यक सेवा वगळून) कोणतीही व्यक्ती वाहन घेऊन विनाकारण फिरत असल्यास त्याचे चारचाकी, दुचाकी जप्त करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे. तसेच वाहन परवानाही जप्त करण्यात येणार असून, साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनमध्ये बाहेर पडणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

पुणे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरुवातीला 5 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. त्याची सर्व तयारी पोलीस, महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. पुढील महिनाभराचा किराणा, भाजीपाला, फळे, पेट्रोल भरण्यासाठी पुणेकरांनी आजही गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. सुरुवातीला 5 दिवस केवळ मेडिकल, दवाखाने, बँका, घरपोच गॅस सेवा, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. या लॉकडाऊनला पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

भाजपने या लॉकडाऊनवर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार, खासदार यांना विचारात न घेता लॉकडाऊन केल्याची टीका खासदार गिरीश बापट यांनी केली. मात्र, आम्ही सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील लाखो कामगारांना लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यांच्यासाठी पॅकेज देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या-

अक्षय कुमारचा येणारा ‘हा’ चित्रपट आणखी लांबणीवर

‘भाजपा’त प्रवेश करणार नाही; सचिन पायलट यांनी केला मोठा खुलासा

कॉंग्रेसला मोठा धक्का,आमदारकीचा राजीनामा देत ‘या’ बाहुबली नेत्याने केला भाजपात प्रवेश

‘ती’ तर आमची चाल, सत्तास्थापनेवर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट