पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, शहरासाठी आज जाहीर होणार नवी नियमावली

Pune

पुणे : देशात १ जून पासून पाचवा लॉकडाउन लागू झाला आहे. मात्र खऱ्या अर्थाने याला अनलॉक एक असल्याचं बोललं जात आहे. राज्यात जरी पाचव्या लॉकडाउन सबंधी नियमावली जाहीर झाली असली तरी राज्यात मुंबई पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण असलेल्या पुणे शहरात आज कंटेनमेंट झोन्स आणि नियमावली आज जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे. त्यामुळे लॉकडाउनची 100 टक्के अंमलबजावणी दोन्ही शहरात करण्यात आली.

परंतु, आता लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या अनलॉक 1 आणि बिगीन अगेन नियमावली जाहीर झाली आहे. पुणे शहरातील कंटेनमेंट झोन्स आणि जिल्ह्यासाठी नवीन नियमावली आज जाहीर होणार आहे. केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनंतर राज सरकारने राज्यातील वेगवेगळ्या भागात कसे निर्णय घेता येतील, याबद्दल नियमावली तयार केली आहे. ज्या त्या भागातील परिस्थितीत पाहून निर्णय घेतले जाणार आहे. याबद्दल जिल्हाधिकारी घोषणा करणार आहे.

मतदारसंघातील एकही शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू देऊ नका – धनंजय मुंडे

5 जूनपासून महात्मा फुले मंडई आणि महिलांचे खरेदीचे आवडते ठिकाण तुळशीबाग उघडणार आहेत. तसंच शहरात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अशा भागासाठीही नवीन नियम लागू होणार आहे. त्याआधी पुण्यातील नागरिकांसाठी सोमवारी एक निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार, पुणेकर आता नियमांचं आणि अटींचं पालन करून बाहेर पडू शकतात. उद्याने, मैदाने यावर मोकळेपणाने त्यांना फिरता येणार आहे. यासाठी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील 150 उद्याने मंगळवार 2 जून पासून खुली व्हायची शक्यता आहे. सकाळी 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उद्यानं उघडी असतील असं सांगण्यात आलं आहे. पण यावेळी मास्क लावणे आवश्यक असेल. मात्र, लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांना उद्यानात प्रवेशबंदी असणार आहे.

युद्ध जिंकणारच : आतापर्यंत राज्यात ३० हजार १०८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले घरी