Pune IT- पुण्यात आय टी इंजीनियर तरुणाची आत्महत्या

पुणे:आंध्र प्रदेशमधून तीन दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या 25 वर्षीय आयटी इंजीनियर तरुणाने आत्महत्या केली आहे. गोपीकृष्ण दुर्गप्रसाद अस या इंजीनियरच नाव आहे. तो मुळचा आंध्र प्रदेशातील क्रिष्णा जिल्ह्याचचा रहिवासी आहे.
        “आय टी क्षेत्रात नोकरीची हमी नाही. मी आर्थिकदृष्टया कमकुवत आहे. त्यामुके कुटुंबाची काळजी वाटते. माझ भविष्य अंधारमय वाटतय. माझ्या कुटुंबाची काळजी घ्या.सॉरी गुड बाय “असा उल्लेख त्याने सुसाईड नोट मध्ये केला आहे.
         विशेष म्हणजे तो तीन दिवसांपूर्वीच पुण्यात आला होता व एका आय टी कंपनी मधे रुजू देखील झाला होता.तिसऱ्याच दिवशी त्याने आत्महत्या केली आहे.त्याची सुसाईड नोट तो राहत असलेल्या खोलीत सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.