कोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ थोडा जल्लोष केला असेल तर बिघडलं कुठे ?

Pue Mahapaika

पुणे : पुणे कोरोना महामारीच्या संकटात पुरते अडकले आहे. कोविड जम्बो सेंटरची अवस्था तर पुरती खालावली आहे. पुणेकर अक्षरशः मरणाच्या दारात अडकले आहेत. मात्र पुण्यातील राजकीय मंडळींना याचं काहीच सोयीरसुतक दिसत नाही. कारण महापौर बंगल्यावर बुधवारी ( २३ सप्टेंबर ) रात्री सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांची एक जंगी पार्टी झाल्याचे वृत्त ‘पुढारी’ने दिले आहे. पुणेकर मरण यातना भोगत असताना राजकीय मंडळींची ही पार्टी नेमकी कोणत्या कारणासाठी झाली याच कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

या पार्टीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृहनेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, मनसेचे वसंत मोरे यांच्यासह काही नगरसेवकही उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

यात धक्कादायक बाब म्हणजे दुपारी काँग्रेसने पालिका कर अभय योजनेवरून भाजपला कमालीचे धुतले होते, आणि रात्री झालेल्या कथित पार्टीचे नियोजन मात्र काँग्रेसच्याच एका पदाधिकाऱ्याकडून केल्याचे बोलले जात आहे.

अशात सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या कथित पार्टीवरून राजकीय नेत्यांना खास पुणेरी शैलीत टोला लगावला आहे. ‘काही दिवसांपूर्वी पुण्याच्या महापौर बंगल्यात रंगलेल्या पार्टीची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु त्यात चर्चा करण्यासारखं काय आहे? कोरोना काळातील उत्पन्नाचं उद्दिष्ट अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ केला असेल थोडा जल्लोष. बिघडलं कुठे? नागरिकांचे हाल काय नेहमीच होत असतात. त्यात माननीयांनी वाईट वाटून घ्यावे असं काय असतं? किती उत्पन्न कुणाचं हा मुद्दा गैरलागू आहे’. असा टोला विजय कुंभार यांनी या सगळ्या बेजबादार राजकीय नेत्यांना लगावला आहे.

pune

आशात मोठ्या आवेशात आम्हीच पुणेकरांचे कैवारी सांगण्याऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांचा बुरखा टराटरा फाटला आहे. मुळातच पुण्यातील परिस्थिती गंभीर असताना अशी पार्टी करण्याची ही वेळ आहे का आणि याचे भान महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांना नाही का, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-