अवकाश विज्ञानातील देशातील सर्वात मोठ्या परिषदेचे आयोजन करण्याचा मान पुण्याला

पुणे- अवकाश विज्ञानातील देशातील सर्वात मोठी परिषद आयोजन करण्याचा मान यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. ही परिषद भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोतर्फे आयोजित करण्यात येते. पुण्यातील आयुका आणि नॅशनल सेंटर फॉर रेडीओ अस्ट्रॉफीझिक्स अर्थात एनसीआरए या संस्था जानेवारीमध्ये होणाऱ्या या परिषदेचे सहआयोजक असणार आहेत.

या आधी 1983 साली पुणे विद्यापीठाला हा आयोजनाचा मान मिळाला होता. अवकाश विज्ञानातील भविष्यातील दिशा आणि उपक्रमाबाबत माहिती घेण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरणार असून देशभरातील प्रमुख संस्थांचे 500-600 प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.