सनातनच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर

पुणे : सनातन संस्थेवर घालण्यात येत असलेल्या बंदीच्या मागणीच्या विरोधात पुण्यात हिंदू जनजागरण समिती , सनातन संस्था आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चा काढण्यात आला. पुरोगाम्यांच्या हत्या झाल्यावर निष्पाप हिंदुत्वनिष्ठांवर होणाऱ्या खोट्या अन् निराधार आरोपांना विरोध करण्यासाठी तसेच सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीस विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

सनातन संस्था दहशतवादी कारवाया करत आहे हे यावरुन स्पष्ट होतेय : नवाब मलिक

दरम्यान, घरात स्फोटक सापडल्या प्रकरणी एटीएसने अटक केलेल्या वैभव राऊत च्या समर्थनार्थ नालासोपाऱ्यात देखील हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या तर वैभव राऊत खोट्या गुन्ह्यात अडकल्याचे आरोप यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता.

सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांना अटक करा : जितेंद्र आव्हाड

आता पुण्यात देखील वैभव राऊत आणि अटक केलेल्या इतर सनातनच्या साधकांच्या समर्थनार्थ महाराणा प्रताप उद्यान चौक ते कसबा गणपति मंदिर असा मोर्चा काढण्यात आला.

दुसरीकडे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या आरोपात अटक करण्यात आलेले सचिन अंदुरे शरद कळसकर यांचा देखील हिंदुत्ववादी संघटनेशी सबंध असल्याचे समोर आले आहे.

हिंदूत्ववादी संघटना नालासोपारा याठिकाणी रस्त्यावर