पुणे महामार्गावर कंटेनर पलटी, चालक किरकोळ जखमी

सातारा : पुणे महामार्गावर बेंगरुटवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील ब्लॅक स्पॉट एस कॉर्नरवर हुबळीहुन मुंबईकडे साखर घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला, मात्र कंटेनरचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

खांबाटकी बोगदा ओलांडून पुण्याच्या दिशेने तीव्र उतार व एस आकाराचे वळण आहे. यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांचे अपघात होतात. कंटेनर (क्र. एमएच ४३ वाय ७४६१) हा एस कॉर्नरला पलटी झाला. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी चालकास खंडाळा पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे

You might also like
Comments
Loading...