भाजपमध्ये गटबाजी चालू देणार नाही – गिरीश बापट

पुणे: आमच्या पक्षात कोणत्याही गटबाजीला थारा नसून भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी चालू देणार नसल्याच सांगत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे महापालिकेवर आपलेच वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच महापालिकेतील काही भाजप नगरसेवकांची बैठक घेत खासदार काकडें गटाकडून सुरू असणाऱ्या गतबाजीच्या राजकारणाला लगाम घालण्याचा प्रयत्न बापट यांनी केला आहे.

24×7 पाणी पुरवठा तसेच इतर योजनांवरून पुणे महापालिकेत भाजपमध्ये खा. काकडे विरुद्ध पालकमंत्री गिरीश बापट गट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज गिरीश बापट यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या नगरसेवकांच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागले होते. दरम्यान बैठकीत बोलताना ‘माझा अधिकार असल्यामुळे पालिकेत आलो आहे. तसेच येत्या जानेवारीपासून शहरातील प्रभाग निहाय आढावा घेणार’ असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

You might also like
Comments
Loading...