पुण्याचे ग्रामदेवता कसबा गणपतीची सेलिब्रेटीकडून महाआरती

सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रोप्य महोत्सवा निमित्त आज पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीची सेलिब्रेटीकडून महाआरती आणि अथर्वशीर्ष पठन करण्यात आले आहे. १२५ नामवंत कलाकारांच्या हस्ते हि पूजा करण्यात आली. यावेळी संपूर्ण कसबा गणपती मंदिराच्या परिसरात कलाकारांची जत्रा पहायला मिळाली. यंदाचा गणेशोत्सव शांततेत ,निर्विघ्नपणे आणि सुरक्षितपणे पार पडावा म्हणून या कलावंताकडून कसबा गणपतीला साकडे घालण्यात आले.

यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक. स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ. पालिका आयुक्त कुणाल कुमार तसेच मराठी चित्रपट श्रुष्टीतील जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले. सुनील महाजन संतोष चोरडिया तसेच जुने – नवे कलाकार यावेळी उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद -पुणे आणि कोथरूड शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद, एकपात्री कलाकार पुणे, शाहीर परिषद,बालगंधर्व परिवार, लोककला -लावणी निर्माता व कलावंत संघ, नाट्य निर्माता संघ, ऑर्केस्ट्रा निर्माता संघ, रंग भूमी सेवक संघ ,नृत्य परिषद , साउंड लाईट जनरेटर असोसिशन आदी संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.