कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत पुण्याची श्रुती श्रीखंडे देशात पहिली

shruti-shrikhande

पुणे- केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत पुण्याच्या श्रुती श्रीखंडेने मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. श्रुती ही ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची मुलगी आहे.

गुरुवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत श्रुतीने यश संपादन केलं आहे. तोंडी आणि लेखी परीक्षा असं या परीक्षेचं स्वरूप असतं.

देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे.