गणपती बाप्पा मोरया; पुण्यात मानाच्या गणपती मिरवणुकांना सुरुवात

dagdusheth ganpati miravnuk

ढोल- तास्यांच्या घुमणारा आवाज. संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण आणि गणपती बाप्पा मोरयाचा एकच जयघोष. सध्या हेच वातावरण संपूर्ण पुण्यात पहायला मिळत आहे. मानाच्या पाचही गणपतीची मिरवणूक निघाली आहे, मानाचा पहिला गणपती असणाऱ्या कसबा गणपतीची चांदीच्या पालखीतून  मिरवणूक निघाली आहे. मिरवणुकीमध्ये देवळणकर बंधुंचे नगारावादन, शिवतेज, श्रीराम ढोल ताशा पथक, प्रभात बँड आदी वाद्यवृदांचा समावेश आहे

 तर भाऊ रंगारी गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीलाही सुरुवात झाली आहे. दरम्यान गणरायाच्या स्वागताला वरुणराजाने हजेरी लावल्याने नागरिकांची थोडीसी धावपळ झाल्याचे चित्र आहे,