पुणे : तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तीनशेहून अधिक एसयुव्ही वाहनांचा ताफा पुण्याला घेऊन गेल्यानंतर गॅंगस्टर गजानन मारणेची राज्यभर चर्चा झाली. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे, गर्दी जमवणे असे आरोप त्याच्यावर आहेत.
गजा मारणे याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही शेकडो चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली होती.या घटनेचे व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांसह पुणे पोलिसांनी देखील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गजा मारणेवर गंभीर गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान, या प्रकरणात आता आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून काढलेल्या मिरवणुकीप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गजा मारणेच्या मिरवणुकीत संजय काकडे यांच्या गाड्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
संजय काकडे यांची वाहने गजा मारणेच्या रॅलीत होती अशी माहिती आहे. याच रॅलीच्या संदर्भात संजय काकडे यांना अटक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. संजय काकडे यांना आज दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. शिवाजी नगर कोर्टात हजर केल्यानंतर, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अधिक माहिती देतील, असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान,मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमी असणाऱ्या 20 हून अधिक टोळ्याविरोधात पुणे पोलीसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. त्यानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदाराला पोलिसांनी अटक केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तारेवरची कसरत लीलया पूर्ण करत अर्थमंत्री अजित पवारांनी दुसरा अर्थसंकल्प मांडला’
- पैठण-औरंगाबाद रस्त्यावर दुचाकीचा अपघात, महिला दिनीच महिलेचा बळी
- ‘अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणे हे तसे जिकिरीचेच काम होते’
- ‘हा अर्थसंकल्प घेणारा नव्हे तर देणारा अर्थसंकल्प’
- … म्हणून गज्या मारणेने अटकेनंतर चक्क मेढा पोलिसांना ठोकला सलाम