भाजप खासदारच म्हणतात आमचे पदाधिकारी बावळट

२४ तास पाणी योजनेवरून पुण्यात कारभाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही

पुणे : पुणे शहरातील समान पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिनीच्या वाढीव निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जीएसटी लागू झाल्यामुळे स्थानिक पातळीवर घेण्यात आल्याचे आयुक्त कुणाल कुमार आणि महापौर मुक्ता टिळक यांनी संगितले आहे. मात्र या निविदा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यानी घेतला असून महापालिकेतील पदाधिकारी जर हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला असल्याचे सांगत असतील. तर पालिकेतील आमचे पदाधिकारी बावळट आहेत अशी टीका भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली आहे

sanjay kakdeपुणे शहरासाठी महत्वपूर्ण असलेल्या २४ तास पाणी पुरवठा योजनेच्या निविदामध्ये रिंग झाल्याचा आरोप विरोधीपक्षांकडून करण्यात येत होता. या बाबद सीबीआयकडे तक्रार करण्यात आल्याने या योजनेचे भवितव्यच धोक्यात आले आहे. दरम्यान आज शहरातील समान पाणी पुरवठा (24×7) योजनेच्या सुमारे 1800 कोटी रुपयांच्या निविदा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे.  मात्र याच निर्णयावरून भाजप नेत्यांमध्ये ताळमेळ नसल्याच दिसून येत आहे

 

 

You might also like
Comments
Loading...