घरगुती कारणावरून एकाची डोक्यात दगड घालून हत्या

youth-crime-

शिरूर: घरगुती कारणावरून एकाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना शिरूर तालुक्यातील खंडाळे गावच्या खेडकर वस्तीनजीक घडली आहे.या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.

प्रकाश मच्छिद्रनाथ खेडकर (वय३४) हा घरगुती कारणावरून भांडण करत होता व त्रासही देत होता.हा राग मनात धरून गुरुवारी उशिरा रात्री आरोपी विकास बबन खेडकर याने प्रकाश याच्या डोळ्यात मिरचीची टाकली.त्यानंतर लोखंडी सळई घेऊन पायावर मारहाण करीत त्याला खाली पाडले व डोक्यात दगड घालून हत्या केली

याप्रकरणाची माहिती मिळताच रांजणगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल गोरे,चंद्रकांत काळे आणि मंगेश थिगळे हे घटनास्थळी पोहोचले.घटनेची माहिती घेऊन २४ तासाच्या आत आरोपीला अटकही करण्यात आली आहे.पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.