पुण्यामध्ये गोमांस असलेली कार पोलिसांच्या अंगावर घालून चालक फरार

पुणे: पिंपरीत कारचालकाने पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, सुरेश शिंदे असं या पोलीस कर्मचाऱ्यांच नाव आहे. धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला.

कारमधून गोमांसची तस्करी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चालकाला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला असता ही घटना घडली. पिंपरीत गोमांसची तस्करी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी दिघी येथील मॅगझिन चौकात सोमवारी पहाटे सापळा रचला. पोलिसांना संशयित कार येताना दिसली. त्यांनी कारचालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना बघून चालकाने कारचा वेग वाढवला.

तिथे तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुरेश शिंदे यांच्या अंगावर त्याने गाडी घातली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावर कार सोडूनच पळ काढला. दिघीतील ग्रामस्थांनी अखेर ती कार थांबवली. यानंतर कारचालक फरार झाला.

या धडकेत कॉन्स्टेबल सुरेश शिंदे हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. या कारमध्ये मांस सापडले असून ते गोमांस आहे की नाही, याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आमदार, खासदारांवरील प्रलंबित खटल्यांसाठी १२ विशेष न्यायालय

२ ऑक्टोबर ला पेन्शन दिंडी निघणार

You might also like
Comments
Loading...