पुणे कॉसमॉस बँक सायबर हल्ला ; उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून कार्डद्वारे तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा दरोडा घालण्यात उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात असल्याची  धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

गेल्यावर्षी ११ व १३ ऑगस्टला पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या कॉसमॉस बँकेचे मुख्यालयातील एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून अज्ञात व्यक्तीने बँकेच्या व्हिसा व रुपी डेबिट कार्ड धारकांची माहिती चोरून भारतासह २९  देशातील एटीएमच्या मदतीने ९४  करोड ४२  लाख रुपये काढले होते. ही रक्कम लंपास करण्यात महाराष्ट्रातील ४२८  एटीएम कार्ड्स तर केवऴ पुण्यातील १७१  एटीएम कार्ड्स वापरण्यात आले होते .

दरम्यान, केलेल्या तपासात या हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तपास अहवालात झालेल्या हल्ल्यामागे उत्तर कोरियातील हॅकर्सचा हात असल्याची माहिती दिली आहे. तब्बल सात महिन्यांनंतर त्या पॅनलने आपला अहवाल सादर केला आहे.