fbpx

नगरसेविका फरजाना शेख यांना दिलासा

corporator farjana shaikh

पुणे: प्रभाग क्रमांक २ मधील भाजप – रिपाईच्या नगरसेविका फरजाना अय्युब शेख याचं जात प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समिती पुणे यांनी वैध ठरवले आहे. यापूर्वी फरजाना शेख यांनी निवडणुकीवेळी सादर केलेला जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला होता. त्यानुसार पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली. यानंतर आता विभागीय जात पडताळणी समितीने शेख यांचे प्रमाणपत्र वैध ठरवल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

प्रभाग क्रमांक 2 मधून इतर मागासवर्ग महिलेसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून शेख विजयी झाल्या होत्या. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर भगवान जाधव व अर्चना कुचेकर यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर सदानंद पाटील, व्ही. आर. गायकवाड, व्ही. ए. पाटील यांच्या समितीपुढे सुनावणी झाली.  जात स्पष्ट होत नाही. या कारणावरून समितीकडून त्यांचे प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आले होते.