मुरली मोहोळ स्थायी समितीतून आउट; चिट्ठीने दिला भाजपला झटका

pmc

पुणे: पुणे महापालिका स्थायी समितीच्या ८ सदस्यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. आज चिट्टीद्वारे स्थायीतून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची नावे काढण्यात आली. यामध्ये विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांच्यासह अन्य चार भाजप चार भाजप सदस्यांचा कार्यकाळ चिठ्ठीने संपुष्टात आणला आहे.

एकूण १६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजपचे दहा राष्ट्रवादी कॉंग्रेस चार तर कॉंग्रेस आणि शिवसेनेचे अनुक्रमे १ – १ सदस्य आहेत. यातील निम्म्या सदस्यांचा कार्यकाळ दरवर्षी संपुष्टात येतो. यासाठी चिट्ठीद्वारे नावे काढली जातात. आज काढण्यात आलेल्या चीठ्यांम्ध्ये विद्यमान अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, हरिदास चारवड, अनिल टिंगरे, योगेश समेळ (भाजप) नाना भानगिरे (शिवसेना) रेखा टिंगरे प्रिया गदादे (राष्ट्रवादी काँग्रेस) अविनाश बागवे (काँग्रेस) हे स्थायीतून आउट झाले आहेत.

दरम्यान ज्या पक्षाचे सदस्य बाहेर पडतात त्याच पक्षाचे नवीन सदस्य स्थायी समितीमध्ये निवडले जातात. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुख्यसभेत आगामी सदस्यांची नावे सादर केली जातील.