पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चुरस; सुनील कांबळेंचे नाव आघाडीवर

पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने पाच टर्मपासून नगरसेवक असणारे सुनील कांबळे यांचे नाव आघाडीवर आहे, तर नीलिमा खाडे, मंजुषा नागपुरे, योगेश मुळीक हे  देखील रेसमध्ये कायम आहेत. नवीन अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे.

विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांना पहिल्याच वर्षी स्थायी समितीमधून बाहेर पडाव लागल्याने सत्ताधारी भाजपला नवीन अध्यक्षांची निवड करावी लागणार आहे. ही निवड होत असताना शहरातील भागांचा आणि गटातटाच्या राजकारणाचा समतोल राखणे भाजपसाठी गरजेच आहे. अध्यक्ष पदासाठी आघाडीवर असणारे सुनील कांबळे हे मागील पाच टर्मपासून नगरसेवक आहेत. त्यामुळे जेष्ठतेनुसार विचार केल्यास त्याचं नाव निश्चित मानल जात आहे. सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभाविप तसेच भाजपमध्ये काम केल्याने कांबळे यांचा वरिष्ठ नेत्यांशी असणारे संबंध देखील त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तर महापालिकेच्या वर्तुळात भाजपचा प्रमुख दलित चेहरा म्हणून देखील त्यांना ओळखल जात.

कांबळे यांच्या बरोबरीने शहराच्या मध्य भागातून प्रतिनिधित्व करणाऱ्या नीलिमा खाडेंच नाव देखील अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.  मागील तीन टर्म पासून खाडे दाम्पत्य नगरसेवक म्हणून शहराच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाणाऱ्या मध्यभागातून काम करत आहेत. तर मंजुषा नागपुरे याचं देखील काम त्यांच्या जमेची बाजू आहे. योगेश मुळीक यांना देखील अध्यक्षपदाची लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.