पुण्यातील भाजप पदाधिकारी खंडणीखोर – चेतन तुपे पाटील

chetan tupe

पुणे शहरामध्ये परिवर्तन होवून महापालिकेच्या सत्तेवर आलेला भाजप पक्ष चुकीच्या पद्धतीने सत्ता चालवत आहे, भाजपचे नगरसेवक विकास कामांमध्ये रिंग करण्यात तर इतर पदाधिकारी खंडणीवसूल करण्यात गुंतले असल्याचा गंभीर आरोप महापालिका विरोधीपक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी केला आहे. पुणे महानगरपालिकेत सत्त्ता स्थापन करुन भारतीय जनता पक्षाला एक वर्षे पुर्ण होत आहेत. या एक वर्षांच्या कार्यकाळावर फेसबुकच्या माध्यमातून भुमिका मांडताना ते बोलत होते.

पुढे बोलताना चेतन तुपे म्हणाले कि ‘ महापालिका सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून संख्याबळाच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केले जातात. मात्र जी डोकी हातवर करतात ती चालतात का हेच कळत नाही ?, शहरातील सार्वजनिक वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. निवडणुकीपूर्वी शहरातील बसेसची संख्या वाढवणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, बस वाढल्या नाहीत तर कमी करण्यात आल्या. विद्यार्थी तसेच जेष्ठ नागरिकांच्या पासचे भाव वाढवले गेले आहेत. पीएमपीएमएल प्रशासनही सत्ताधाऱ्यांचे एकत्र नसल्याचा आरोप यावेळी तुपे यांनी केला.

केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना असणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चेतन तुपे यांनी स्मार्ट सिटी योजना म्हणजे पुणेकरांची स्मार्ट फसवणूक असल्याचा आरोप केला. आधीच विकसीत असणाऱ्या शहराच्या केवळ एक टक्का भागावर स्मार्ट सिटी योजना राबवली जात आहे. त्यातही ५३ प्रकल्प होणार असल्याचे सांगितले, पण प्रत्यक्षात एकही योजना सुरळीत असल्याचे दिसत नाही. हेच चित्र भामा आसखेड योजनेबद्दल दिसत असून प्रकल्प पूर्ण करण्याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नसल्याच ते म्हणाले.

२४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे काढून मोठा सोहळा केला गेला. त्यावेळी याला नाविन्यपूर्ण योजना म्हंटल गेल, मात्र. कर्ज काढन म्हणजे नाविन्य आहे का?, भाजप सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय असा असा आहे. त्यामुळे येत्या १५ मार्च रोजी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी महापालिकेवर धडक मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती चेतन तुपे पाटील यांनी दिली.