वरुणराजाच्या हजेरीने महापालिकेच्या बाईक रैलीचा फज्जा

pune corporation bike raili fails

यंदा पुणे महापालिकेकडून सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रोप्य महोत्सवा अंतर्गत ‘वैविध्यपूर्ण’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणजे आज काढण्यात आलेली बाईक रैली. या बाईक रैलीमध्ये किमान एक हजार दुचाकी सहभागी होतील असा अंदाज पालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांनी लावला होता .मात्र, घडल उलटच एकतर रविवारचा दिवस त्यातून डोक्यावर कोसळणारा वरुणराजा यामुळे पुणेकर भक्तांनी या रैलीकडे सपशेल पाठ रॅलीचा चांगलाच फज्जा उडाल्याच दिसून आल.

गर्दी जमत नाही हे दिसल्यावर पालकमंत्री गिरीष बापट यांनीही रैलीला हिरवा झेंडा न दाखवताच काढता पाय घेतला. आधीच या महोत्सवावर वेगवेगळ्या वादाचे सावट आहे त्यातच आज वरुणराजानेही हजेरी लावल्याने बाईक रैलीचा फज्जा उडाला. त्यामुळे सत्ताधारी भाजपवर ‘प्रेम’ करणाऱ्या विरोधकांना चांगलाच चर्चेचा विषय मिळाला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रोप्य महोत्सवाच्या निमित्ताने आज सकाळी आठ वाजता पर्यावरणाचा संदेश देत बाईक रैली काढण्याच नियोजन पालिकेकडून करण्यात आल होत. या रैलीला गर्दी जमवण्यासाठी शहरात मोठ-मोठे फ्लेक्सही लावण्यात आले होते. मात्र पहाटेपासूनच बरसणाऱ्या वरूनराजामुळे पुणेकरांनी या रैलीत सहभागी होण टाळल. तर भाजपचे ७ ते ८ नगरसेवक सोडता उपमहापौरासह पालिका आयुक्त तसेच इतर भाजप नगरसेवकांनी रैलीला दांडी मारली . त्यामुळे केवळ फायर ब्रिगेडच्या दुचाकी, पालिका कर्मचारी आणि काही भाजप कार्यकर्त्यांच्या ८० ते १०० गाड्यामध्येच हि बाईक रैली काढण्यात आली.