पुणे: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील १ली ते ८वी पर्यंतच्या शाळा बंद (Schools closed) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ होत असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असल्याचे सांगितले आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील देखील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ आणि अन्य नेते, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पहिली ते आठवी पर्यंतची शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. मुंबई नंतर पुण्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आगामी काळात पुण्यात आणखी कडक नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदय विकाराचा झटका, रुग्णालयात दाखल
- ‘…त्यामुळे दरेकरांवर फौजदारी संहितेनुसार कारवाई करा’; नवाब मलिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- “सरकारच्या हाताला नव्हे तर…”; शरद पवारांच्या वक्तव्याची आठवण करुन देत चंद्रकांत पाटलांची टीका
- औरंगाबादेत पाणीपुरवठा वाढवण्याच्या घोषणेचा पालकमंत्र्यांना विसर; पालिकेकडून केराची टोपली..!
- ‘तुझ्याशिवाय मी काय करू शकते’ असं समंथा कोणाला म्हणतेय ; चर्चेला उधाण
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<