‘इंदू सरकारला’ काँग्रेसचा विरोध सुरूच

कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे मधुर भांडकरांची पुण्यातील पत्रकार परिषद रद्द

पुणे : ‘इंदू सरकार’ या सिनेमावरून सुरू झालेला काँग्रेस विरुद्ध मधुर भांडारकर हा वाद आणखी चिघळत चालला आहे. याचीच एक झलक पुण्यात देखील पहायला मिळाली. पुण्यात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मधुर भांडारकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, मात्र . नियोजित पत्रकार परिषद काँग्रेसच्या विरोधामुळे रद्द करावी लागली आहे  .

 इंदू सरकार या मधुर भांडारकर दिग्दर्शित सिनेमाला सध्या देशभर काँग्रेसकडून  विरोध केला जात आहे. आणीबाणी च्या कलखंडावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाच्या माध्यमातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं चारित्र्यहनन करण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेसकडून करण्यात येत आहे

आज मधुर भांडारकर सिनेमाच्या प्रमोशनसाठी पुण्यात पत्रकार परिषद घेणार होते तसेच बावधन या ठिकाणी असणाऱ्या सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ला देखील भेट देणार होते.  मात्र पुणे शहर काँग्रेसच्या विरोधामुळे हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले. जोपर्यंत सिनेमा आम्हाला दाखवला जात नाही तसेच सिनेमातील आक्षेपार्ह भाग वगळला जात नाही तोपर्यंत तोपर्यंत आम्ही विरोध करत राहू अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. 

या आंदोलना वेळी माजी गृहराज्यमंत्री तथा पुणे कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश बागवे यांनी तर एक पाऊल पुढे टाकत वेळप्रसंगी सिनेमाला विरोध करण्यासाठी कायदाच हातात घेऊ असा इशारा दिला आहे. दरम्यान कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

 

You might also like
Comments
Loading...