मोहन जोशी यांचा ‘स्वत:च्याच पायावर धोंडा’ गणेशमंडळांचा कैवार आला अंगाशी, फेसबूक व्हिडिओमुळे ट्रोल

पुणे : ‘गुलाल किती उरला रे? पोतभर. काय सांगतो? हो काय करणार आता मिरवणुकीत पहिल्यासारखी मजाच नाही राहिली राव?’ अशा आशयाचा गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचा संवाद असणारा व्हिडिओ आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी सोशल मीडियावर टाकला खरा पण हा व्हिडिओ त्यांच्या चांगलाच अंगलट आला. गणेशमंडळांचा कैवार घेऊन मतांची गोळाबेरीज करू पाहणाऱ्या जोशी यांना फेसबूकवरून नेटीझन्सने प्रचंड ट्रोल केले. पुरोगामी पक्षाला हिंदू सणांचा आताच पुळका कसा येतो? असा प्रतिसवाल नेटीझन्सकडून विचारला गेल्याने मोहन जोशी यांना ‘स्वत:च्या पायावर धोंडा’ पाडून घेतल्याचा प्रत्यय आज आला असावा.

त्याच झाल अस की, मूळ उद्देशापासून वाहवत चाललेल्या गणेश मिरवणुकांना शिस्तीच्या चौकटीत बसविण्यासाठी काही कठोर निर्णय भाजप सरकारने घेतले. त्यामुळे गणेशमंडळाची घोर निराशा झाल्याचा धागा पकडत हा व्हिडिओ तयार करण्यात आला. साहजिक, हा व्हिडीओ प्रसारित केल्याने नेटीझन्स आपल्या सुरात सूर मिसळतील असे त्यांना वाटले असावे. पण घडले उलटेच. ‘तुमचा आणि संस्कृतीचा काय संबंध?’, ‘तुमचेच बेगडी हिंदुत्व,’ ‘आम्हाला हिंदूना कोणी अक्कल शिकवायची गरज नाही.’ ‘ढोंगी पक्ष, जसे आहोत तसेच मैदानात उतरा,’ ‘शेवटी आलेच जाती धर्मावर. ,’ ‘अभिनेता मोहन जोशी यांना आम्ही ओळखतो.’ अशा एका वरचढ एक प्रतिक्रियेतून जोशींना पर्यायाने काँग्रेसला नेटीझन्स चांगलेच झोडून काढले.

Loading...

‘एकीकडे विरोधी पक्षाचे उमेदवार गिरीश बापट आपल्या धडाकेबाज प्रचारातून लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. वैयक्तिक टीकाटिपण्णी टाळून केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचणे, ध्येय त्यांनी समोर ठेवले आहे. विविध जाती धर्माच्या मेळाव्यांना त्यांना आवर्जून आमंत्रित करून पाठिंबा दर्शविला जात आहेत. बापट यांचे आख्खे कुटुंबच प्रचारात सक्रीय आहे. त्यामुळे पराभवाच्या भितीनेच असे खालच्या पातळीचे कृत्य विरोधक करत असल्याच्या भावना महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून या प्रकारानंतर व्यक्त केल्या जात आहेत.

खर तर ज्या विधायक हेतूने लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली तो हेतूच गेल्या काही वर्षात लोप पावला की काय असे चित्र निर्माण झाले होते. एकूणच बेशिस्तपणाचा कळस गाठलेल्या या मिरवणुकांना शिस्तीच्या कक्षेत आणण्यासाठी गेल्या २-४ वर्षात प्रशासन, राज्य शासन आणि महापालिका यांच्याकडून काही निर्बंध लादले गेले. या मागचा हेतू आपण सर्वानीच लक्षात घ्यायला हवा. समाजहित जपणाऱ्या मुद्यांवर श्रेयवाद आणि आरोप प्रत्यारोपाचे राजकारण होऊ न देण्याचे भान प्रत्येक उमेदवाराने राखायला हवे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपचा 'हा' डॅशिंग आमदार उतरला मैदानात
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील