पुणे शहर माजी महापौर संघटनेकडून CAA-NRC ला विरोध

टीम महाराष्ट्र देशा –  NRC व CAA या कायद्याला विरोध करण्यासाठी आज पुणे शहरात ‘पुणे शहर माजी महापौर संघटने’तर्फे सिटी पोस्ट चौकात खासदार सौ वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व माजी महापौरांनी धरणे आंदोलन केले.

या वेळी बोलताना माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, दत्ताभाऊ एकबोटे विठ्ठलराव लडकत,बाळासाहेब शिवरकर,सुरेश शेवाळे,प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, अंकुश काकडे, सौ कमल ह्यवहारे,सौ दीप्ती चवधरी, सौ रजनी त्रिभुवन,अभय छाजेड इत्यादींनी या कायद्याविषयी माहिती नागरिकांना दिली.

यावेळी CAA कायद्यामुळे देशातील नागरिकांचे किती नुकसान होणार आहे हे त्यांनी नागरिकांना  पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच हा कायदा होणार नाही याची दक्षता सर्व भारतीय नागरिकांनी घ्यायला हवी आणि त्यासाठी जनआंदोलन उभे केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले . पुणे महानगराचे १३ माजी महापौरांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला.