fbpx

बेरोजगारी संपवण्यासाठी शिवसेनेचा हा ‘फंडा’

Shivsena

पुणे : युवकांच्या देशात बेरोजगारी ही मोठी समस्या असल्याचा दावा पुणे युवासेना शहराध्यक्ष किरण साळी यांनी केला आहे. युवकांनी फसव्या जाहिरातींना बळी न पडता आपली खरी मदत कोण करते याच आकलन कराव आणि मगच सारासार निर्णय घ्यावा अस देखील किरण साळी यांनी सांगितलं आहे. ‘महाराष्ट्र देशा’च्या शोध युवा नेतृत्वाचा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
जे युवक बेरोजगार आहेत त्यांनी युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घ्यावी अथवा युवसेनेच्या वेबसाईट ला भेट देऊन आपली तक्रार नोंदण्याच आवाहन किरण साळी यांनी केल आहे.

नक्की युवकांना नोकरी मिळवण्यासाठी युवसेना कशी मदत करणार आहे आणि युवकांचे कोणते प्रश्न युवसेनेला महत्वाचे वाटतात. पहा ही सविस्तर मुलाखत ‘शोध युवा नेतृत्वाचा’ या खास कार्यक्रमात.