पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा केरळातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

ncp

पुणे : केरळमध्ये आलेल्या महाप्रलयाने हजारो संसार उघड्यावर आले आहेत, तर पुरामुळे लाखो लोकांना बेघर होण्याची वेळ आली आहे, या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांनी मदतीचा हात पुढे केला असून, पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तांना देणार असल्याची माहिती, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिली आहे.

केरळ राज्यामध्ये पावसाने थैमान घातले आहे, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत लाखों संख्येत लोकांना आपले राहते घर सोडावे लागले आहे, तर 350 च्यावर लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नैसर्गिक संकटात सापडलेल्या केरळच्या मदतीला अनेक राज्य – देश धावून आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार – खासदार आपले एक महिन्याचे मानधन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचं पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं.

Loading...

दरम्यान, आता पुणे महापालिकेत असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४१ नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन केरळसाठी देणार आहेत. यामध्ये एका नगरसेवकाला २० हजार रुपयांचे मानधन मिळते, त्यानुसार गोळा होणारा ८ लाख २० हजारांचा निधी केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दिला जाणार असल्याचं चेतन तुपे यांनी सांगितले. त्याचबरोबर पुरग्रस्तांना औषधोपचार व अन्य साहित्यांची गरज असल्याने, शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून औषधोपचार व अन्य साहित्याची मदत गोळा करून ती केरळला पाठविण्यात येणार असल्याचे तुपे म्हणाले.

भद्रावती नगरपरिषदेवर सेनेचा भगवा

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले