fbpx

पुण्यात चित्रपटगृहांमध्ये धक्कदायक प्रकार, प्रेक्षकांना विकले जातायत खराब दर्जाचे समोसे

टीम महाराष्ट्र देशा: रस्त्यावर बनवलेले अन्नपदार्थ बघितल्यानंतर अनेक जण नाक मुरडतात, मल्टीप्लेक्स, मॉलमध्ये मात्र कोणता पदार्थ कसा बनवला आहे, हे न पाहता महागड्या दराने विकत घेतले जातात. मात्र पुण्यातील मल्टीप्लेक्समध्ये अव्वाच्या सव्वा दराने विकले जाणारे समोसे अत्यंत गलिच्छ ठिकाणहून येत असल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.

पुणे शहरातील आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलीस, विशाल इ – स्क्वेअर या चित्रपटगृहांमध्ये एम. के. एन्टरप्रायजेस नावाच्या उत्पादकाकडून समोसा घेतला जातो, हे समोसे पिंपरीमधल्या खराळवाडीतील अत्यंत गलिच्छ ठिकाणी बनवले जात असल्याचं उघड झाले आहे.

दरम्यान, समोशाच्या दुकानातले उत्पादन बंद करण्याचे आदेश अन्न आणि औषध पुरवठा विभागाने दिले आहेत. समोसा तयार करण्याचे ठिकाणी प्रचंड अस्वच्छता असल्याने पुरवठादारावर ही कारवाई करण्यात आली आहे.